विधानसभेत बहुमत सिद्ध करु……तर मविआतून बाहेर पडण्याची तयारी

0
19

साईमत लाईव्ह  मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उस्मानाबादमधील आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दोन वेगळ्या भूमिका मांडल्या.सुरुवातीला संजय राऊत यांनी हा संघर्ष पोहोचल्यास महाविकास आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावात विजयी होईल, असे नमूद केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावर पुन्हा परतील हा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
यावेळी संजय राऊत यांनी गुवाहाटीमधील आमदारांना एक आवाहन केले. मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव मांडा, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे नसले तरी शिवसैनिक ठाण मांडून बसला आहे कारण, आपल्या सगळ्यांना उद्धव ठाकरे इथं येतील हा विश्वास आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय संकट आहे. मुंबईतून कोण कुठें गेले आहे या बातम्या पाहत आहोत. मुंबईतून सूरतला कोण गेले, गुवाहाटीला कोण गेले आणि गोव्याला गेले या बातम्या पाहिल्या. कैलास पाटील सुरत आणि गुवाहाटीमधून नितीन देशमुख परतले आहेत.शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण भाजपने केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. राजकारणाने किती खालची पातळी गाठली आहे.कैलास पाटील, नितीन देशमुख इथं आहेत. त्यांच्या ताब्यातील २१ आमदारांचा संपर्क झालेला आहे. ते आमदार मुंबईत येतील त्यावेळी हे आमदार शिवसेनेचे असतील, असे संजय राऊत म्हणाले. विधानसभेत संघर्ष पोहोचल्यास विजय महाविकास आघाडीचा असेल, असे संजय राऊत म्हणाले.
राऊतांचा मोठा दावा
आता या क्षणी ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. या सर्व आमदारांची इच्छा महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावे, मुंबईत यावं. उद्धव ठाकरेंसमोर बोलावे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबद्दल विचार करु, मात्र, मुंबईत या असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here