यावल ः तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील न्हावी गावातील भारत विद्यालयात ऑगस्ट2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यतचे े154 दिवसांचे धान्य वाटप विद्यार्थ्यांना “मापात पाप“ करण्याच्या उद्दिष्टाने वजन काटा न वापरता स्टीलच्या बालटीने करण्यात आले.कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने धान्य वाटप प्रक्रियेत वजन काट्याऐवजी स्टील बाल्टीचा वापर करण्यात आला.अशी शक्कल संबंधितांनी का? व कशासाठी? लढविली,विद्या मंदिरातच विद्यार्थ्यांना मापात पाप कसे करावे याचे धडे दिले जात आहेत का?असे अनेक प्रश्न न्हावी ग्रामस्थांसह तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उपस्थित केले जात आहेत.
सविस्तर माहिती अशी की, गेले 7 महिन्यापासून विद्यार्थी धान्यापासून वंचीत होते.दोन दिवसापूर्वी यावल तालुक्यातील न्हावी गावातील भारत विद्यालयात ऑगस्ट2021 ते फेब्रुवार2022पर्यतचे 154 दिवसांचे मूग व हरभरा वाटप करण्यात आले.
सदर धान्य वाटप करतांना इयत्ता पहिली ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्यांन 15किलो तांदूळ, मूग डाळ 4 किलो, हरभरा 4 किलेो250 ग्रॅम,तर सहावी ते आठवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना23 किलो100 ग्रॅम तांदूळ,मूग डाळ 6 किलो,हरभरा डाळ 6 किलो 400 ग्रॅम असे शासनाकडून वाटप करण्यात येते.त्यानुसार मात्र न्हावी येथील भारत विद्यालयात ऑगस्ट2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यतचे े154 दिवसांचे वाटप नुकतेच करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना मूगडाळ व हरभरा वाटप करण्यात आले मात्र ही वाटप करीत असतांना वजन काटा न वापरता अंदाजे स्टीलच्या बालटीने धान्य वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मिळालेले धान्य कमी प्रमाणात दिले गेले की जास्त प्रमाणात दिले? शिक्षण विभागासह शालेय समितीने लोक प्रतिनिधींनी याबाबतची एक चौकशी समिती नेमून विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रत्यक्षपणे जाबजबाब घेऊन चौकशी करून कार्यवाही कडक कारवाई करावी असे न्हावी ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
सदर न्हावी येथील भारत विद्यालयात धान्य वाटप करण्यात आले. या संदर्भात यावल तालुक्याचे नाईमुद्दीन शेख यावल गट विस्तार शिक्षण अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली असता यावल तालुक्यातील 65 शाळेमध्ये 54 दिवसांचे शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करतांना वजन काटा करूनच वाटप करणे अनिवार्य आहे अशी माहिती नाईमुद्दीन शेख यावल गट विस्तार शिक्षण अधिकारी यांनी दिली.
न्हावी येथील भारत विद्यालयात कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला.यावेळी कुठलेही वजन न करता सरळ स्टीलच्या बालटीने धान्य वाटप करण्यात आले तसेच जे विद्यार्थी व पालक शालेय पोषण आहार घेण्यासाठी आलेले त्यांना त्वरित पिशवीमध्ये मूगडाळ व हरभरा एक-एक स्टीलची बालटी भरून देण्यात आले. ही तर चक्क भारत विद्यालयात कंत्राटदार व संबंधित अधिकारी प्रशासनांची फसवणूक करीत आहे तसेच शाळेत विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराचे,गैर प्रकाराचे,वजनाच्या मापात पाप कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक धडे कसे दिले जातात याचे प्रात्यक्षिक खुद्द शाळेतूनच केले जात असल्याने यामुळे विद्यार्थ्यांवर,शिक्षणावर काय परिणाम होईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.असाच प्रकार मागीलवर्षी सुद्धा झाल्याने एका प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांने यात मोठी तडजोड केली होती, त्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचे यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात शासकीय कामे करताना,चौकशी करतांना अनेक किस्से यावल तालुक्यात चर्चिले जात असल्याने त्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशी व्हायला पाहिजे असे सुद्धा बोलले जात आहे.