Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे फलक मराठीत करा ;युवासेनेच्या मागणीला यश
    जळगाव

    विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे फलक मराठीत करा ;युवासेनेच्या मागणीला यश

    SaimatBy SaimatMay 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांना ८ एप्रिल २०२२ रोजी देण्यात आले होते.

    युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश परिपत्रक क्रमांक २६/२०२२ द्वारे प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.
    राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खाजगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, असा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे. मात्र विद्यापीठाच्या पातळीवर असे होताना दिसून येत नव्हते. विद्यापीठातील सर्व अधि विभागांची नावे ठळक अक्षरात मराठीत करण्यात यावीत. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत.

    विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे. अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
    यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, जितेंद्र बारी, अमित जगताप, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, गिरीष सपकाळे, भुषण सोनवणे, अमोल मोरे, प्रितम शिंदे, विद्यापीठ युवाधिकारी अनिकेत पाटील, ॲङ अभिजीत रंधे, यश सोनवणे, मयूर रंधे, सागर पाटील, ध्रृवा पाटील, पुष्पक सुर्यवंशी आदि युवासैनिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.