विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने आंदोलन

0
21

जळगाव ः प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने 189 कर्मचारी कार्यरत असून गेल्या दोन महिन्यापासून वेतन रखडल्याने शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले.
विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई व क्लार्क यांचा समावेश असून सुमारे 189 कर्मचारी कार्यरत आहे. दोन महिन्यापासून वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजता प्रशासकिय इमारती समोर ठिय्या आंदोलन केले. तसेच कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. यावेळी येत्या दोन दिवसात वेतन देण्यात येईल असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व कामावर रुजू झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here