विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. सागर गरुड यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श डॉक्टर सेवा गौरव पुरस्कार

0
48

पाचोरा : प्रतिनिधी

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.सागरदादा गरुड यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३० डिसेंबर बुधवार रोजी पार पडणार असून तो मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद  येथे  होणार आहे.
डॉ सागर सुनिलराव गरुड हे शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील असून ते विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा येथे संचालक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्यांना दैनिक दिव्य मराठीचा गौरव रुग्णसेवा २०१९ हा पुरस्कार मिळाला आहे.त्यांना कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रातील विविध संस्थांनी सन्मानपत्र देऊन गौरवले आहे.समाजाचे आपण देणे लागतो, हा मानव देह पुन्हा नाही,त्यामुळे समाजाची सेवा आपण केली पाहिजे असे विचार त्यांचे आहेत.
डॉक्टर सागर दादा यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर े मुंबई, पुणे येथे न जाता आपल्याच भागातील जनतेची सेवा करता यावी याकरिता ग्रामीण भागात प्रशस्त असे मोठे हॉस्पिटल उभारून पुणे, मुंबई येथे जाऊन रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी या हेतूने पाचोरा येथे सर्व सोयीयुक्त असे विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सुरु केले.त्यात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत हजारा हून अधिक मोफत ऑपरेशन यशस्वी झाले आहेत. शेंदुर्णी, भडगाव,पाचोरा या ठिकाणी ते वैद्यकीय सेवा देत असतात. विविध गावांमध्ये आरोग्य शिबिर घेणे, रक्तदान शिबिर घेणे, अन्नदान वाटप करणे, शेतकर्‍यांना मदत करणे, वृक्षारोपण करणे, असे विविध उपक्रम ते राबवित असतात. जामनेर, पाचोरा तालुक्यामध्ये गावागावांमध्ये आरोग्य सेवक त्यांनी नेमले आहेत. सागर दादा गरुड यांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्याबद्दल पत्राद्वारे संस्थापक-अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.या पुरस्काराबद्दल डॉ. सागरदादा गरुड यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here