जळगाव ः प्रतिनिधी
गेल्या 13 मे रोजी पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास डी मार्टच्या पाठीमागे आदर्शनगर भागात चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग मधील मिळून एकूण सहा मोटारसायकल व दोन फोर व्हीलर गाड्या अज्ञात व्यक्तीने जाळून 18 लाख रु.चे नुकसान केले होते.
गाडी मालकांच्या भावना व संवेदना अतिशय तीव्र होत्या.कोणाशी काही वैर नाही तरी त्यांचे असे नुकसान झाले होते.
नुकसानीला जबाबदार तरी कोणाला धरायचे व त्याने असे नुकसान केले तरी का? असा सर्वांच्या पुढे प्रश्न होता.
या प्रकरणी पंधरा दिवसात सतत तपासाची चक्रे फिरवून या गुन्ह्याची उकल रामानंद पोलीस स्टेशनचे सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर विजय शिंदे व त्यांच्या टिमने केली असून यातील आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघड करण्यात यश आले आहे.आकाश गणेश महाजन (वय 21)रा.तांबापुरा यास गुन्ह्यात अटक केली आहे.दारु व सोलूशन आणि इतर वेगवेगळ्या नशा केल्यावर तो असे कृत्य करतो अशी माहिती त्याच्याकडून मिळाली आहे.