वाळूची चोरटी थांबेल का ? महसूल विभाग सुस्त?

0
64
साईमत लाईव्ह मेहुणबारे ता. चाळीसगांव प्रतिनिधी
येथील तिरपोळे रोड लगत असलेल्या मारुती मंदिराजवळ बैलगाड्याच्या साह्याने गिरणा नदी पात्रातून वाळू उत्खनन करून याच मंदिराजवळ साठवण करून, वाळू गौण खनिजाचे विना परमिट चोरटी वाहतूक केली जात आहे.
  तसेच खडकी धरण मशिदवाडी रस्त्यालगत या ठिकाणावरून विना परमिट , अवैधरित्या मुरूम व दगडाचे उत्खनन व वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग कोमात व वाळू मुरूम दगड माफिया जोमात !!!
 गेल्या अनेक दिवसांपासून हे वाळू चोरीचे अभियान नियमीत व जोमात सुरू असूनही, येथे  नियुक्त महसूल चे अधिकारी व कर्मचारी अर्थपूर्णरित्या कानाडोळा करीत आहेत. नियमितपणे व दररोज वाळू ,मुरुम व दगडाची विना परमिट व अवैधरित्या चोरी होत आहे. बैलगाड्या द्वारा तिरपोळे रस्त्या लगत असलेल्या मारुती मंदिराजवळ तर कधी अरिहंत मेडिकल शेजारी वाळूची साठवण करून थप्पा मारून, तेथून ट्रॅक्टर मध्ये भरून चिंचगव्हाण , लोंढे ,दरेगाव , खडकी , ईसापुर या गावांमध्ये विक्री केली जात आहे. ही चोरीची वाळू ६ ते ७ हजार रुपये दराप्रमाणे विक्री केली जात आहे. बऱ्याचदा विना नंबर प्लेट ओमनी द्वारे वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.
              सकाळी चार वाजेपासून ते दिवस उजाडल्यानंतर दहा वाजेपर्यंत मुरूम दगड इत्यादीचे उत्खनन व चोरटी वाहतूक करण्यात येते. हे विना परमिट व चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी महसूल विभागाचे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे डोळे लाल होतील का ? असा सवाल पंचक्रोशी मधून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here