जामनेर तालुक्यातील प्रतिनिधी
–
शेंदुर्णी येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी संबंध नसलेल्या वादात शिवसैनिकाला ओढून त्याची बदनामी केल्याबद्दल व सतत शेंदुर्णीत शहरात जातीय सलोखा वारंवार बिघडवणार्या व जातीयवाद निर्माण करून शहरातील शांतता बिघडवणार्या मुख्याधिकारी यांचेवर कार्यवाही करणे बाबत आज पाऊस पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांना शेंदुर्णी शहर शिवसेना शाखेतर्फे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की, शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने शहरात वाद निर्माण करीत असतात.
गत सात तारखेला त्यांनी शेंदूरणी शहरातील काही लोकांना नगरपंचायतीच्या लेटर पॅड वर त्यांचे सहीनिशी धमकीचे पत्रे पाठवली त्यात शिवसैनिक अजय भोई व संजय दादा यांच्या संभाषणाचा उल्लेख आहे, संजयदादा गरुड हे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी असलेले संजय दादा गरुड यांना संजू दादा ह्या नावाने संबोधल्या जाते मात्र, मी शिवसेना शहर प्रमुख व शिवसैनिक अजय भोई दाव्याने सांगतो की आम्ही श्री संजय दादा गरुड व नगरपंचायत मुख्य अधिकारी यांच्याकडे कधीही विकास कामाची मागणी व पुर्तता संबंधात गेलो नाही. श्री अजय भोई राहत असलेल्या वार्डात मुख्याधिकारी साजीद पिंजारी यांनी हेतुपुरस्कर महिलांचे सौचालय बांधले नाही यासंदर्भात शिवसैनिक पदाधिकारी सोबतच अजय भोई तिथे जात होता, मात्र पत्रातील उल्लेखानुसार कधीही कोणाशी संभाषण झाले नाही ,तरीही मनात आकस व द्वेष ठेऊन अजय भोई यांचे नाव पत्रात गोऊन बदनामी केली आहे, सदर पत्र व्हाट्सअप वर व पत्र आलेल्यांनी ते गावभर दाखविले मात्र मुख्याधिकारी पिंजारी यांनी सदर पत्रा बाबत कोणताही खुलासा केला नाही, याउलट मुख्याधीकारी पिंजारी यानी ते पत्र स्वत सोशल मीडियावर सुद्धा वायरल केले व आमचा कट्टर शिवसैनिक अजय भोई याच्या बदनामीस ते जबाबदार आहे अशी आमची ठाम समजूत झालेली आहे.
या पूर्वीही मुख्अधिकारी त्यांनी कोणतीही पूर्व सूचना व नोटीस न देता कोणतेही ठोस कारण नसताना श्री हनुमान मंदिरावरील फक्त भगवे झेंडे काढण्याचा अट्टहास पूर्ण केला. कर्मचाऱ्यांनी सदर विषया बाबत शहरात संवेदनशील व जातीय सलोखा बिघडणार असल्याने करण्यास नकार दिला असता त्यांनाही त्यांनी कामात कुचराई केल्याबद्दल नोटीस दिलेली आहे.
त्या आधीही त्यांनी महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण आकृती फ्रेंम कोणतीही पूर्वसूचना न देता सफाई, कर्मचाऱ्यांच्या हातून खाजगी इमारतीवरून उतरविली होती त्यामुळे शहरात्त तणाव निर्माण झाला होता
काही महिन्यापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे ची शिवसेनेला सकाळी दिलेली परवानगी संध्याकाळी पत्र पाठवून सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर डकवून रद्द केली होती
तांडे दिवाळीच्या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव आंदोलन व उपोषणाचे शस्त्र उगारावे लागले होते .सफाई कर्मचारी चार दिवस कडाक्याच्या थंडीत बसल्या नंतरही त्यांना पाझर फुटला नाही, आपल्या कार्यालयाच्या मध्यस्थी मुळे त्यांची दिवाळी सुखाची गेली व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला होता त्यांच्या अशाच वागणुकीमुळे न प चे पदाधिकारी, यांनीही शहरात शांतता बिघडवणार्या CEO च्या विरोधात न प वर मोर्चा नेला होता मुख्याधिकारी हे पाताळयंत्री आहेत, ते स्वतः वरील घटना हेतपुरस्सर निर्माण करतात,म्हणजे महितीअधिकारात कुणीही काही विचारू नये, भ्रष्टाचार संबंधी कुणीही अर्ज/फाटे करू नये हा त्यांचा उद्देश असतो, अस व्हारल पत्रावरून दिसते आता ते पत्र कसं खोटं आहे त्याची चौकशी करावी इत्यादी ठरवलेली ? नाटका नुसार ते तुम्हाला काम लावतील त्यांच्यावरील अनेक भ्रष्टाचार संबंधी तक्रारी वर पर्यन्त गेलेल्या आहेत ,ययामुळे ते सतत असेच गाव पेटवन्याचे काम करत असतात,व नंतर सारवासारव करतात असा अनुभव आहे, म्हणून आमची आपणास शेवटची विनंती आहे की शेंदुर्णी तील जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी ,आपण त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी,व पुन्हा पुन्हा -वारंवार अशाच प्रकारचे कृत्य त्यांच्या हातून घडत गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अन्यथा आम्हाला पुन्हा न प वर सहरवासीयांचा मोर्चा न्यावा लागेल
याप्रसंगी शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे युवा सेना शहर आधिकारी अजय भोई प्रवीण चौधरी युवराज बारी विलास बारी अशोक बारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते