मनवेल ता.यावल : (वाघोदा ता.यावल) येथील ३५ वर्षीय युवकाने पाटाच्या कालव्या जवळ साकळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सांयकाळी उघळकीस आली.
वाघोदा ता.यावल येथील जगदीश हिरामण पाटील वय ३५ असे मयत युवकाचे नाव आहे. मी माझा वैयक्तिक आयुष्याला कंटाळुन आत्महत्या करीत असल्याने कुणाच्या काहीही एक संबध नसून कुणाला त्रास होईल असे वागु नये हि विंनती अशी सुसाईड नोट लिहुन युवकाने आत्महत्या केली आहे.या तरुणाच्या मृत्यूने वाघोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
