साईमत वरणगाव ता. भुसावळ प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ” मेरी मिट्टी मेरा देश ” हे अभियान देशात राबवण्यात येणार असून वरणगाव नगर परिषदेत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानातंर्गत माजी मंत्री आ. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत देशासाठी बलीदान देणाऱ्या शुरविरांसाठी समर्पित अभियान देशभरात राबवले जात आहे . यामध्ये ‘ मेरी मिट्टी , मेरा देश ‘ या अभियानातंर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच मातृभुमी झटणारे व प्राणाची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान असा कार्यक्रम वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे .
१४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता माजी मंत्री आ. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद ते मच्छींद्रनगर उद्यान पर्यंत वृक्ष दिंडी व तिरंगा रॅली तसेच स्वातंत्र्य सैनिक आणि विरांना वंदन कार्यक्रम व अमृत वाटीका वृक्षरोपण. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ :१५ मिनीटांनी नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहण होणार असुन सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी समीर शेख (मुख्याधिकारी, नगर परिषद ), प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.