वन्य प्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला सोयगाव वन विभागाकडून मदत

0
20

 

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

या बाबत अधिकची माहिती अशी की, श्री राजेंद्र नामदेव सोळंके यांना शेतात काम करत असताना रानडुकराने धडक देऊन जखमी केले होते. सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला व पीडित व्यक्तीस मदत मिळवून दिली. बुधवार दिनांक १ जून रोजी राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव प्रा. यांनी पीडितास धनादेशाचे वाटप केला यावेळी श्री ए.आर.शेंडगे लिपिक, श्री वनरक्षक श्री एन. ए. मुलताने, श्री व्ही. आर. नागरे, वनमजूर वाहुळे, चंद्रकांत इंगळे. कृष्णा पाटील आदींची उपस्थिती होती.

पशुधन हानी, पीक नुकसानी तसेच वन्य प्राण्यांच्या मनुष्यावर हल्याबाबत वन विभाग अत्यंत संवेदनशील असून कर्मचाऱ्यांना देखील याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत- राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव प्रा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here