यावल : प्रतिनिधी
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याने शनिवार दि.23 रोजी रावेर तालुक्यातील मांगी करंजी परिसरात व यावल तालुक्यात रिधोरी गावाजवळ वाहनाच्या धडकेने हरिणचा एक पाय फॅक्चर झाल्याची घटना दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान घडली.रिधोरी ग्रामपंचायत सरपंच,सर्पमित्र,वन कर्मचारी यांच्या दक्षतेने हरीणावर फैजपूर येथे पशु पक्षीय वैद्यकीय अधिकारी यांनी औषध उपचार केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,रिधोरी येथील सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी भ्रमणध्वनी वरून दिलेली माहिती अशी की दि.23 रोजी रिधोरी ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर सोनवणे हे आपल्या कामानिमित्त बाहेर गावी जात असताना त्यांना रिधोरी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला एक हरीण जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले,त्यांनी लगेच आपल्या भ्रमणध्वनी वरून रिधोरी गावातील सर्पमित्र किशोर सोनवणे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून माहिती दिली या दोघांसह वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रवींद्र तायडे,वाहन चालक सचिन चव्हाण,वनपाल तुकाराम येवले तसेच खिर्डी येथील सर्पमित्र शाखाप्रमुख अजय कोळी यांनी जखमी हरिणाला तात्काळ फैजपूर येथील पशुपक्षी वैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्याच्या पायावर पुढील औषध उपचार केला.हरिण सध्या यावल वन विभागात वन कर्मचारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे हरिन चालण्या योग्य झाल्यानंतर त्याला पुन्हा वन विभागात सोडण्यात येईल अशी माहिती मिळाली.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याने वनविभागात अनेक ठिकाणी पाण्याचे कृतीम पाणवठे निर्माण केले गेले पाहिजेत आणि यासाठी वन विभागाच्या माध्यमातून विविध संघटना समाजसेवकांनी पुढाकार घेऊन वन्यप्राण्यांच्या हिताचे निर्णय दरवर्षी उन्हाची तीव्रता सुरू होण्याच्या आधीच घ्यायला पाहिजे अशी रास्त अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.