यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअमरनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच झाली, या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सविता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन सर्व जागांची बिनविरोध निवड झाली.
वड्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सविता अतुल भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी घेण्यात आलेल्या सभेत चेअरमनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या सभेला नवनिर्वाचित संचालक लिलाधर भगवान चौधरी, व्ही.पी.चौधरी, प्रमोद चौधरी, पकंज चौधरी, सचिन चौधरी, फत्तु तडवी, लुकमान तडवी, मुबारक तडवी, भागवत भालेराव, रेखा सुनिल पाटील, छाया रविन्द्र पाटील यांच्या सरपंच अजय भागवत भालेराव,अतुल भालेराव आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या सभेत निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन संदीप शिंदे हे होते. तर त्यांना संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे व शिपाई शब्बीर तडवी यांनी सहकार्य केले . यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालकांचे जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले. उपस्थितांचे आभार सचिव सुनिल सुरवाडे यांनी मानले.
