लोहाऱ्यात अखेरच्या दिवशी २०३ शेतकऱ्यांनी काढला पिक विमा

0
33

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

कैलास आप्पा मित्र मंडळातर्फे आयोजित मोफत पिक विमा शिबिरात मंत्री गिरीश महाजन, सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा भाजपाच्या माध्यमातून लोहारा, कासमपुरा, म्हसास, रामेश्वर, शहापुरा येथील २०३ शेतकऱ्यांनी मोफत पिक विमा काढला. पिक विमा काढण्याचा ३ ऑगस्ट रोजी शेवटचा दिवस असल्याने शिबिराचे आयोजन केले होते.

शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद सोनार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते, शेतकरी, भाजपा ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक जोहरे हे दिवसभर थांबून होते. ग्रामपंचायत सदस्य पती अनिल तडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी नऊ ते रात्री १० वाजेपर्यंत जवळपास २०३ शेतकऱ्यांचे पिक विमा मोफत काढून दिले. अनिल तडवी आणि त्यांच्या टीमने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टी, लोहारा शाखेतर्फे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here