लोणार(गुलाब शेख) ज्या भाजपाच्या नेत्यांना गावात प्रवेश करतानाही विचार करावा लागायचा त्याच भाजपाचे आज महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार,आमदार, नगराध्यक्ष,नगरसेवक इतकेच नव्हे तर सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत.
अवहेलना,अपमान, तिरस्कार,त्रास सोसून भाजपा आज कार्यकर्त्यांच्या अपरिमित मेहनतीतून समाजमान्य पक्ष झाला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक समाजघटक,गाव,खेडे,पाडा,वाडा,वस्ती,असा विस्तारत पक्ष वाढला. कार्यकर्त्यांच्या त्याग, तपस्या आणि बलिदानातून आज हे भाजपाला विराट रूप मिळाले आहे.
जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या माझ्या”भारतीय जनता पक्षाच्या”स्थापना दिनाच्या” सर्व कार्यकर्ता बंधू -भगिनी एवं सर्व पदाधिकारी हा उत्सव साजरा केला…
6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली.
21ऑक्टोबर 1951 जनसंघ-डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दिनदयालजी ते 6 एप्रिल 1980 भा.ज.पा.- श्रध्येय अटलजी,आडवाणीजी ते आज मा.मोदीजी ‘अमितजी असा हा,अंगीकारलेल्या विचारांशी एकनिष्ठ राहून,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेत जुन्या व नव्या कार्यकर्ते, नेत्यांनी,लोकप्रतिनिधींनी केलेला दीर्घ प्रवास.
सत्ता हे साध्य नसून साधन आहे
अंत्योदय सर्वांचा विकास,सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय सर्वांनी समोर ठेवले
त्या वेळेस स्व.अटलजींनी उदगारलेले वाक्य,’ सुरज उगेगा,अंधेरा छटेगा,कमल खिलेगा ‘ याची प्रचिती आज येतेय.
1984 – 2 खासदार
1989 – 86 खासदार
1991 – 119 खासदार
1996-1998-1999 लोकसभेत सर्वाधिक खासदार
2004 नंतर सलग 10 वर्ष केंद्रात विरोधी पक्ष म्हणून काम.
2014 – भाजपा चे मा.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरील सरकार.मा.मोदीजी पंतप्रधान म्हणून शपथ सबका साथ सबका विकास
2019- 303 खासदार ,परत मा.नरेंद्र मोदीजी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
1951 साली लावलेल्या रोपाची मुळे तळागाळा पर्यंत पोहचून त्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.व आपण त्याचा एक भाग आहोत याचा अभिमान आहे.
6 एप्रिल भाजपा चा स्थापना दिनमोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला,यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस उत्सावाप्रमाणे साजरा केला,
भाजपा चा झेंडा व स्टिकर आपल्या घरावर लावू कमल रांगोळी तसेच डॉ मुखर्जी – पंडीत दीनदयाळजी यांना अभिवादन केले यावेळी गजानन मापारी,भगवानराव सानप,विजय मापारी,प्रकाश नागरे,मारोतराव सुरूशे,उध्दव आटोळे,पंढरी मापारी,गणेश तांगडे,विलास सानप, कृष्णा राठोड,शेख जावेद,गणेश डव्हळे,शंकर खोसरे,विनोद थोरवे,संजय बुरुकुल,गणेश काकड,किसन गुंजकर,विष्णु डोळे,रविन्द्र डोळे,बाबाराव गिते,देविदास चाटे,संजय डोळे,दिनकर डोळे,महादेव गाढवे,ज्ञानेश्वर डोळे,बंडु पाटील,किजन सरकटे,बाळासाहेब कुलकर्णी,फिरोज खान,रामेश्वर डोळे,अमोल डोळे,शेषराव वांजरे,शिवहरी चाटे,विजय डोळे,केशव देव्हडे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमास हजर होते.