Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»लोखंडी पाईपने तरुणाला मारहाण
    क्राईम

    लोखंडी पाईपने तरुणाला मारहाण

    SaimatBy SaimatMay 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    शहरातील मालधक्क्यावर सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला चार जणांकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, शहरातील मोहन टॉकीजवळील रहिवासी संजय सुधाकर नेवरे (वय-२८) हा तरुण ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. तो दोन वर्षांपूर्वी मालधक्क्यावर सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. शनिवारी १४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथून योगेश व किरण सपकाळे यांना भेटून योगेश सरदार याच्यासोबत मालधक्क्याकडून गावात येत होते.
    यावेळी रेल्वे धक्क्यावरील कोपर्‍यात काही हमाल व राजू पटेल, त्याचा मुलगा जास्मीन पटेल, मेहमुद पटेल व त्याचा साला यांचे भांडण सुरु होते. तेव्हा संजय नेवरे व किरण सपकाळे हे भांडण सोडवासोडव करण्यासाठी गेले असता, भांडण करणार्‍यांनी मारामारी करण्यासाठी आले असल्याचे समजून पटेल यांच्यासह त्यांच्यामुलांनी त्यांना शिवीगाळ करून जास्मीन पटेल याने नेवरे यांच्या पायाच्या पंजावर लोखंडी पाईपने मारीत त्यांना दुखापत केली. तसेच त्याला “तू कैसे जलगाव मैं रहता देखते” असे म्हणत त्याला धमकी देवून त्या ठिकाणाहून निघून गेले.

    यावेळी नेवरे याला आमीन पठाण यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी रविवार, दि. १५ मे रोजी दुपारी त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Amalner : अमळनेरला अर्थसंकल्पात २५ कोटींचा निधी

    March 7, 2026

    Jalgaon:जळगावच्या विकासाला गती; अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी ₹२२.५ कोटी मंजूर

    March 7, 2026

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.