जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी या संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसहकार गटाने 21 उमेदवार उभे केले आहेत या निवडणुकीच्या प्रचारार्थ काल नूतन मराठा कॉलेज जळगाव येथे प्रचार मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याला लोकसहकार गटाचे पॅनलप्रमुख मनोज पाटील सर गटाचे अध्यक्ष शामकांत भदाणे , जेष्ठ सदस्य सुनिल सूर्यवंशी ,सुभाष जाधव देशमुख यांनी मेळाव्याला संबोधित केले.
त्यात मनोज पाटील सर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अहवाल छपाईत 14 लाखाची बचत केली , 218 रुपयात 3 लाखाचे विमा कवच करून दिले, सहामाही वर्गणीची तिमाही नुसार वर्गणीवर व्याज आकारणी , कर्जवाढ मर्यादा पहिले वर्षी 2 लाख दुसऱ्या वर्षी 2 लाख पगाराच्या टप्प्यानुसार केली , संस्थेचे जळगाव महानगरपालिकेकडे असलेली थकबाकी 6.25 कोटी पूर्ण वसूल केली , अपंग सभासद बांधवांना 1 लाख वाढीव कर्जमर्यादा , सर्व सभासदांना संस्थेच्या आपल्या खात्याची माहिती ही मोबाईलवर पाहता यावी यासाठी मोबाइलला ॲप तयार केले , ज्येष्ठ सभासद यांना मतदानाचा अधिकार आमच्या गटाचे ज्येष्ठ उमेदवार सुनील सूर्यवंशी यांनी मिळून दिला. या प्रमाणे जसा लोकसहकार गटाचे पॅनलप्रमुख मनोज पाटील सर यांनी सर्व सभासदांना लोकसहकार गटाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केले.
यानंतर अध्यक्ष शामकांत भदाणे , जेष्ठ सदस्य सुनील सूर्यवंशी ,सुभाष जाधव – देशमुख यांनी आम्हास लोकसहकार गट स्थापन का करावा लागला, 2015 साली सहकार गटाला 21 संचालक निवडून बहुमत मिळाले परंंतु गटातील काही संचालक मनमानी कारभार करत होते म्हणून 2019 साली मनोज पाटील सर यांनी 11 संचालकांना सोबत घेऊन लोकसहकार गट स्थापन केला आणि 2019 साली लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवड करून मनोज पाटील सरांना जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी या संस्थेच्या अध्यक्षपदी बसविले. मिळालेल्या 22 महिन्यात लोकसहकार गटाने सभासद हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आणि याचे फलित म्हणूनच आज लोकसहकार गटाला 2022 च्या निवडणूक प्रचार दरम्यान जळगाव जिल्हाभरातून मतदारांचा उत्स्फूर्त आशीर्वाद मिळत आहे अशी स्पष्टाक्क्ती अध्यक्ष शामकांत भदाणे , ज्येष्ठ सदस्य सुनिल सूर्यवंशी ,सुभाष जाधव – देशमुख यांनी केली.
या मेळाव्यास स्थानिक मतदार संघातील शैलेश पाटील , शरद पाटील , सुमित पाटील , सुनील सूर्यवंशी ,महिला राखीव मधील छाया सोनवणे , प्रतिभा सुर्वे , अनुसूचित जातीतील यशवंत सपकाळे, विमुक्त जातीतील सुभाष जाधव देशमुख , इतर मागासवर्गातील संजय पाटील , बाहेरील मतदारसंघातील हरिश्चंद्र बोन्डे , अनिल गायकवाड पाटील , राजू गायकवाड , एन. एस. पाटील , नवल पाटील , प्रकाश पाटील , डॉक्टर शांताराम पाटील , अजयराव सोमवंशी ,ज्ञानेश्वर सोनवणे , रवींद्र सोनवणे , नगरसेवक सचिन पाटील सर , बाळासाहेब चव्हाण , दिलीप अण्णा चांगरे , प्रमोद चीलाणेकर , गजानन देशमुख , सुरेश इंगळे , रविंद्र पाटील इत्यादी मेळाव्यास उपस्थित होते.