लोणार/शेख गुलाब
लोणार येथे भारतीय जनता पार्टी कडुन लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष बाप्पू देशमुख व डॉ.गणेश दादा मांन्टे,सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष प्रा.गजानन घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.
लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांनी आपले पूर्ण जीवन संघर्षमय परिस्थितीतून प्रवास करून सामान्य व्यक्तीला न्याय कसा मिळेल यासाठी त्यांनी आपले पूर्ण जीवन समर्पित केले.आपलं पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले, तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली आहे.
लोणार येथे पुण्यतिथी साजरी करताना प्रमुख उपस्थिती जिल्हा सरचिटणीस संतोष बापू देशमुख व डॉ.गणेश दादा मांन्टे,प्रा.गजानन घुले यांच्या सह शहराध्यक्ष गजानन मापारी,विजय मापारी,प्रकाश महाराज मुंडे,चंद्रहास सोनुने,भगवानराव सानप,मारोतराव सुरूशे,उद्धव आटोळे,प्रकाश नागरे,शुभम बनमेरु,राम मापारी, बाळासाहेब कुलकर्णी,गणेश तांगडे,सुबोध संचेती,शेख जावेद,गजानन वाघ,विष्णू डोळे,रवि डोळे,गणेश मुंडे,श्रीधर तारे व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.



