जळगाव : प्रतिनिधी: सागर पार्क मैदानावर सोमवारी लेवा पाटीदार सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक अंतर्गत लेवा पाटीदार प्रीमियर लिगला दुसऱ्या दिवसी एकूण 8 सामने झाले. दुसरा दिवसही फलंदाजांनी गाजला.
सोमवारी झालेल्या सामन्यात बलाढ्य अस्मी एकर्स संघाने ठेवलेले 166 धावांचे लक्ष्य सोयो सनरायडर्स संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत आव्हान कायम ठेवून जिंकले. जयेश नारखेडे याने शेवटच्या शतकात सलग तीन षटकांर लगावत हा सामना जिंकल्याने तो सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात भूमी वॉरियर्स संघाने दिलेले 124 धावांचे लक्ष्य धनंजय ॲग्रो संघाने नवव्या षटकांतच पूर्ण केले. तिसऱ्या सामन्यात एकनाथ ऑटो रायडर्स संघाने दिलेले 129 धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी पंकज भुसावळ संघाने नवव्या षटकांतच पूर्ण केले. वरणगावच्या जेडी इलेव्हनने पद्मालय संघाला दिलेले 107 धावांचे लक्ष कमी षटके राखून गाठले. यात नरेंद्र पाटील हा खेळाडू सामनावीर ठरला तर गोदावरी फायटर्स विरुद्ध विघ्नहर्ता इलेव्हन सामन्यात गोदावरीने दिलेले 136 धावांचे लक्ष्य विघ्नहर्ता संघाने
49 चेंडूतच गाठून घेतले. यात 25 चेंडूत 68 धावा करणारा कौस्तुभ पाटील सामनावीर ठरला. तर सहावा सामन्यात वरणगाव इलेव्हन आणि अस्मी एकर्स यांच्यात झाला. यामध्ये अस्मी एकर्सने पुन्हा एकदा दहा षटकात द्विशतक करीत 207 धावांचे लक्ष्य वरणगाव संघासमोर ठेवले. या सामन्यात प्रफुल्ल चिरमाडेने 30 चेंडूत 98 धावा केल्या. इतर दोन सामने रात्री उशिरापर्यंत सुरू होते.