लिव्ह इन मध्ये असलेल्या महिलेचा दाबला गळा ; तर दोन मुलांना ढकलले विहिरीत

0
10

कोल्हापूर : वृत्तसंस्था
अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने सोबत राहणाऱ्या महिलेसह दोन मुलांचा गळा दाबून खून केला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव वेलंग शिरंबे येथे ही घटना गुरुवारी (१६ जून) उघडकीस आली.

सविस्तर माहिती अशी की, पोलिसांनी दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजेबोरगाव, ता. जि. उस्मानाबाद; सध्या रा. वेलंग (शिरंबे) जि. सातारा) याला अटक केली आहे. दत्तासोबत योगिता दत्ता नामदास (३८) दोन मुलांसह राहत होती. तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने योगिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर योगिताच्या तनू आणि समीर या दोन्ही मुलांना झोपेतून उठवले आणि मळ्यातील विहिरीत ढकलून दिले. तिघांचे खून करून घराला कडी लावून तो निघून गेला. अकलूज पोलिसांनी दत्ताला त्याच्या मूळ गावात अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here