जळगाव ः प्रतिनिधी
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या द्वितीय उपप्रांतपालपदी गिरीश सिसोदिया यांची निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. जळगाव शहराला 15 वर्षांनंतर हा बहुमान मिळाला. लायन्स क्लब इंटरनॅशलची ही प्रांतीय परिषद सिल्वासा (गुजरात) येथे झाली. या परिषदेत खान्देश, मराठवाडा, विदर्भ येथील 16 जिल्ह्यांतील 490 सदस्य उपस्थित होते.
परिषद प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. परिषदेला माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू (औरंगाबाद), डॉ. व्ही. के. लडिया , राजू मनवाणी, नरेंद्र भंडारी यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान माजी प्रांतपाल प्रेम रायसोनी, एच. एन. जैन, सतीश चरखा, सुगन मुणोत, रवींद्र गांधी, शिरीष सिसोदिया, रितेश छोरीया आदींनी सहकार्य केले.