लस उपलब्ध आहे का? गुगलवर मिळणार माहिती, जाणून घ्या

0
31

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । गुगलच्या माध्यमातून या आठवडय़ापासून हिंदुस्थानातील 13 हजारांहून अधिक ठिकाणी नागरिकांना कोरोना लसीच्या उपलब्धतेविषयी आणि लसीकरणाच्या अपॉइंटमेंट्सविषयी माहिती उपलब्ध होणार आहे.

ही माहिती कोविन अॅप्सच्या रीअल-टाइम डेटाच्या मदतीने मिळणार असून यात प्रत्येक लसीकरण केंद्रामधील अपॉइंटमेंट्सची उपलब्धता, दिल्या जाणाऱ्या लसी आणि कोणत्या डोससाठी लसीकरण सुरू आहे, लसीकरणाचे शुल्क आणि अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कोविन वेबसाइटची लिंक गोष्टींचा समावेश असेल. गुगल सर्चच्या डायरेक्टर हेमा बुडाराजू म्हणाल्या, ‘साथीच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना अधिकाधिक माहितीची गरज भासू लागली आहे. त्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here