भुसावळ : प्रतिनीधी
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे मक्तेदार मनवानी हे गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेचे ठेके घेण्याचे काम करीत असून, आपले काम चालावे म्हणून ई. एन. ऑफिस च्या शेजारी तसेच अकाउंट ऑफिस च्या पाठीमागे ” के “टाइप कॉटर मध्ये आपले ऑफिस तयार करून मोठ्या थाटात आपले कामकाज चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेश तायडे यांनी सदर कॉटर संबंधीची माहिती माहिती अधिकारात मागताच सदर ठेकेदाराने रेल्वे कॉटर मध्ये नटवलेले आपले आलिशान ऑफिस जमीनध्वस्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन वर्षांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे हद्दीतील अतिक्रमण रेल्वे कर्मचारी राहत असलेल्या “के” टाइप कॉटर वरती हातोडा चालविला सदर रेल्वे अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेची चांगली कॉटर उध्वस्त करून रेल्वेच्या लाखो रुपयांची आहूती दिली, मग अकाउंट ऑफिस च्या पाठीमागील कोणाला ना दिसणारे दोंन ‘के’ टाईप कॉटर्स का तोडले नाही याची शहानिशा माहिती अधिकार कार्यकर्ता राजेश तायडे यांनी केली असता असे समजले की, सदर ठेकेदार मनवानी यांनी रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेल्वेच्या ” के ” टाइप घरांमध्ये आपले ऑफिस तयार करून आपल्या चार-पाच कर्मचाऱ्यांनसह आपली सगळी कामे तेथुन करत आहे.
सदर ठेकेदाराने गेल्या सात आठ वर्षापासून त्या घरावरती कब्जा केला असून रेल्वेचे पाणी, विज, संडास, बाथरूम, आणि जागेचा वापर करीत असून आपली मनमानी करीत होता.
यासाठी सदर ठेकेदाराने रेल्वेला गेल्या सात आठ वर्षापासून किती रक्कम अदा केली आहे, कोणत्याही अधिकाराच्या परवानगीने हा ठेकेदार त्या ठिकाणी राहत होता, त्या अधिकाऱ्याच्या परवानगीचे पत्र मिळावे अशी माहिती, माहिती अधिकाराखाली मागितली असता माहिती देण्या आधीच सदर ठेकेदाराने रेल्वेच्या घरा मध्ये तयार केलेले ऑफिस हे जमीनध्वस्त केले.
रेल्वेचे हे कॉटर जमीनध्वस्त का केले असा प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांना पडला असून या प्रकरणाची सीबीआय तथा विजिलेंस स्तरावर चौकशी व्हावी मागणी केली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाच्या उच्च स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेश तायडे यांनी केली आहे.