Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह घटना दुरुस्तीची आवश्यकता !
    यावल

    राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह घटना दुरुस्तीची आवश्यकता !

    SaimatBy SaimatJune 15, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल प्रतिनिधी 

    आज देशामध्ये दर वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे.अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे.धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा प्रचार करणे हा शब्द काढला पाहिजे.त्यासोबत गोवा सरकारने विधानसभेत या संबंधीचा ठराव पारित करून केंद्रशासनाला पाठवला पाहिजे.तरच अवैध धर्मांतरणावरती संपूर्ण बंदी येईल. स्वत:च्या धर्माचे पालन करण्याला कोणतीही आडकाठी आणण्याची आवश्यकता नाही; मात्र इतरांना फसवून, जबरदस्ती करून किंवा त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे,अशी मागणी सीबीआयचे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वरराव यांनी पत्रकार परिषदेत केली.

    ते दशम‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिनी फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’तील विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.)चारुदत्त पिंगळे,ख्रिस्ती पंथ सोडून हिंदु झालेल्या तेलंगणा येथील श्रीमती एस्थर धनराज, छत्तीसगड येथे लाखो हिंदूंची घरवापसी करणारे भाजपचे प्रदेशमंत्री प्रबल प्रतापसिंह जुदेव आणि नेपाळ येथील विश्व महासंघचे जिल्हाध्यक्ष शंकर खरेल उपस्थित होते.

    यावेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु(डॉ.)पिंगळे म्हणाले की,धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृती करून त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण प्रारंभ केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाही.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धर्मांतर बंदी कायदा करण्याची घोषणा केली आहे.त्याचे आम्ही स्वागत करतो.तसेच गोव्यात डॉमनीक आणि अन्य ख्रिस्ती प्रचारकांकडून जे धर्मांतर चालू आहे,ते रोखण्यासाठी गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासह संविधानात पालट करायला हवा. छत्तीसगड येथील भाजपचे प्रदेशमंत्री प्रबल प्रतापसिंह जुदेव म्हणाले की,हिंदूंच्या धर्मांतर करणाऱ्या विदेश शक्तींकडे प्रचंड पैसा आणि साधने आहेत.

    माझ्या वडीलांनी लाखो हिंदूंची,तर मी 15 हजार हिंदूंची घरवापसी केली आहे;मात्र हे करतांना आमच्यावर जीवघेणी आक्रमणे मिशनरी,
    नक्षलवादी यांच्याकडून झालेली आहेत.धर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धर्म समिती स्थापन करून धर्मसेना उभी केली पाहिजे.त्याने चांगला लाभ झालेला आहे. नेपाळ येथील शंकर खरेल म्हणाले की,नेपाळमध्ये 3 कोटी लोकसंख्येच्या देशात 30 लाख लोक धर्मांतरीत झाले आहेत.ही चिंतेची बाब आहे.

    हे धर्मांतर रोखण्यासाठी गरीबी,शिक्षण आणि अन्य मूलभूत गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे.तेलंगणा येथील एस्थर धनराज म्हणाल्या की,मी स्वत: ख्रिश्चन होते;मात्र अमेरिकेत गेल्यावर बायबलचा अभ्यास केल्यावर त्यात तर्कशास्त्र नसल्याचे लक्षात आले.पुढे भारतात आल्यावर मिशनरी लोकांकडून धर्मांतरासाठी चाललेली षड्यंत्रे पाहून त्या विरोधात जागृती चालू आहे.तसेच धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मांत आणण्याचे आणि युवकांना समुपदेशन करण्याचे काम करत आहे.असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात हिंदू जनजागृती समिती राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.