Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा? 28 फेब्रुवारीलाच का होतो
    राज्य

    ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा? 28 फेब्रुवारीलाच का होतो

    SaimatBy SaimatFebruary 28, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    विज्ञान अर्थात ‘सायन्स’हा एक केवळ शिक्षण क्षेत्रातलाच भाग नाही तर यामधून जे बदल घडतात ते देशाला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विज्ञानाला एक वेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात अनेक बाबींचे महत्व कमी होते विज्ञानाच्या माध्यमातून जे संशोधन केले जाते त्याचे महत्व अधिक कोरले जाते. असेच संशोधन भारतीय (Physicist) भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केले होते. त्यामुळे सबंध देशात आज (National Science Day) विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. (The Work of Researchers) संशोधकांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी ठरावे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या अनुशंगाने सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था एवढेच नाही तर शास्त्रज्ञ आणि संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी ‘रामन परिणामा’चा शोध लावला होता. या त्यांच्या कार्याचा गौरव करीत 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीयच नव्हते तर अशिया खंडातील पहिले व्यक्ती होते. तेव्हापासून हा दिवस देशामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जात आहे.
    संशोधन संस्था अन् विद्यापीठ उभारणीत योगदान
    चंद्रशेखर वेंकट रामन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगीरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वौच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारकडून दरवर्षी वेगळी थीम घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे.
    भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रामन यांचे कार्य
    भौतिकशास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धुळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणाच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हा पसरलेला प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात यालाच रामन इफेक्ट असे म्हणतात. या शोधासाठी त्यांना नोबेल व्यतिरिक्त 1954 मध्ये सर्वोच्च भारतीय पुरस्कार ‘भारतरत्न’ने गौरवण्यात आलं.
    संशोधकांच्या कार्याचा आढावा आजच्या विद्यार्थी आणि तरुणांसमोर ठेऊन देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती व्हावी हा मुख्य उद्देश आहे. देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे आणि अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा त्या मागचा उद्देश असून ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ व ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच बरोबर ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा संशोधनामध्ये आवड आहे त्यांना प्रोत्साहित करण्याचा देखील सरकारचा मानस आहे.
    दरवर्षी एक नवी संकल्पना घेऊन हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 ची थीम नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टीकोन”, समोर ठेऊन हा दिवस साजरा केला जात आहे. विज्ञानाशी संबंधित सर्व मुद्द्यांचे आणि विषयांचे सार्वजनिकपणे कौतुक करणे आणि प्रोत्साहन देणे हा यामागील हेतू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Gangster Bandu Andekar’s House : अजित पवारांच्या पक्षाने कुख्यात गुंड बंडू आंदेकरांच्या घरात दिली २ तिकीटं; नव्या वादाला तोंड फुटणार?

    December 30, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.