साईमत बोदवड प्रतिनिधी
राष्ट्रीय विकलांग पार्टी च्या रेल रोको आंदोलनास व्यापारी संघटनेने पाठींबा जाहीर केला.दिनांक ६ रोजी राष्ट्रीय विकलांग पार्टी ची अग्रसेन भवन बोदवड येथे बैठक झाली.
यावेळी पार्टी तर्फे ९ ऑगस्ट रोजी सुरत अमरावती, दादर सेवाग्राम, अहमदाबाद हावडा या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा या साठी रेल रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनास बोदवड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थिती देऊन पाठींबा जाहीर केला.
बैठकीला राष्ट्रीय विकलांग पार्टीचे पदाधिकारी व इतर दिव्यांग बांधव, व्यापारी संघटना पदाधिकारी तसेच नगरपंचायत बोदवड नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या वेळी राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या रेल रोको आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेवटपर्यंत सोबत राहू असे आश्वासन नगरपंचायत चे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी तसेच व्यापारी संघटना बोदवड तालुका पत्रकार संघटना यांनी निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचे सर्वांचे राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.