चाळीसगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय कन्याशाळा (ज्यु.कॉलेज)मध्ये ‘ बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या अभियाना अंतर्गत लाभार्थींचा बक्षीस वितरण समारंभ दि.२२-२-२०२२ मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी मा.श्री.विलास भोई साहेब, रा.स.शि.प्र.मंडळ लि.चाळीसगाव या संस्थेचे सचिव बापूसाहेब मा.श्री.अरुण भिमराव निकम,व्हाईस चेअरमन दादासाहेब मा.डॉ.श्री.संजय गोपाळराव देशमुख, सहसचिव आबासाहेब मा.श्री.संजय रतनसिंग पाटील, विषयतज्ञ मा.सौ.सुमनताई पाटील, शाळेच्या प्राचार्या मा.डॉ. सौ.साधनाताई निकम,उपप्राचार्या मा.सौ.कल्पनाताई देशमुख व पर्यवेक्षक दादासाहेब मा.श्री.विजय पवार हे उपस्थित होते सर्व प्रथम ईशस्तवन व स्वागतगीत कु.अनुराधा कसबे ईने सादर केले त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.विलास भोई साहेब हे होते .
शाळेच्या प्राचार्या मा.डॉ. सौ.साधनाताई निकम यांनी प्रास्ताविकात शालेय उपक्रमांची माहिती दिली तसेच शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले प्राचार्या मा.डॉ. सौ.साधनाताई निकम यांनी वाचनीय पुस्तकांचा सेट शाळेच्या ग्रंथालयाला सप्रेम भेट म्हणून दिला रा.स.शि.प्र.मं.लि.या संस्थेचे सचिव मा.श्री.बापूसाहेब अरूणजी निकम यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थींनीना तसेच निराधार विद्यार्थींनीना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून सत्कार करण्यात आला
शाळेतील उपशिक्षक श्री.विनोद नेवरे यांनी विद्यार्थिनीना नवनवीन आव्हान पेलण्याचे आव्हान केले शाळेच्या ग्रंथपाल सौ.पी.एम.शर्मा यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’या विषयावर एक सुंदर गीत सादर केले विद्यार्थीनी मनोगत कु.तेजल कोकाटे व कु.नम्रता वाघ ईने व्यक्त केले संस्थेचे सहसचिव मा.श्री.आबासाहेब संजय रतनसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेचे सचिव मा.श्री.बापूसाहेब अरुणजी निकम यांनी विद्यार्थींनीना मोबाईलचा योग्य कामासाठी वापर करावा असे सांगितले अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी मा.श्री.विलास भोई साहेब यांनी विद्यार्थिनीसाठी पंचायत समिती तर्फे अनेक योजना राबविल्या जातात त्या योजनेचा विद्यार्थिनीनी लाभ घ्यावा तसेच त्यांनी गुणवंत विद्यार्थींनीना मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.अनिताताई पाटील, सांस्कृतिक विभाग उपप्रमुख सौ.वंदनाताई निकम, प्राध्यापिका सौ.अंजली पाटील व उपशिक्षीका सौ.मनिषा सोनवणे यांनी केले आभारप्रदर्शन उपशिक्षक श्री.सचिन राणे यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले