साईमत यावल प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल तालुका अध्यक्षपदी विरावली येथील माजी ग्राम पंचायत सदस्य पवन युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. येथील शेतकी संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत युवकचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पवन पाटील यांना निवड पत्र दिले.
पवन पाटील हे आपल्या विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादी विचार सरणीचे जोडलेले व्यक्तिमत्त्व आहे. याआधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षांमध्ये संघटनेची जबाबदारी पार पडली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून शरद पवार यांच्या शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी विविध आंदोलने सुरुवातीच्या काळात केली, त्यानंतर युवक राष्ट्रवादी मध्ये काम करत असताना प्रदेश स्तरावरून आलेल्या निवेदने आंदोलने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारीत्यांच्यावर सोपविली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, चोपडा पंचायत समितीचे सभापती डी.पी.साळुंखे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय पाटील, बोदडे नाना, फैजपूरचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, वि.का.संचालक किरण पाटील, अन्वर सईद, जाकीर भाई, ललित पाटील, राहुल चौधरी, रोहन महाजन, अशोक भालेराव, मोहसीन भाई, चंद्रकांत येवले, विशाल पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील, गणेश पाटील सारंग अडकमोल, मनोज तडवी, गजानन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील, भैय्या पाटील, योगेश पाटील, निलेश बेलदार, गिरीश पाटील, राजेश अडकमोल, कोमलसिंग पाटील, मनू महाजन, विनोद पाटील, तुषार येवले, पितांबर महाजन, भगवान बर्डे आदी उपस्थित होते.