राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश सरचिटणीसपदी रमेश पाटील

0
13

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील रमेश भगवान पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या सहीचे पत्र आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रमेश भगवान पाटील यांना दिले.

ग्रामीण भागातून आलेले रमेश भगवान पाटील यांनी अल्पावधीतच राजकीय आणि उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन समाजसेवा करत राजकीय क्षेत्रातही रमेश पाटील यांनी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सन २००० पासून कार्यरत रमेश पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या सोबतच वेळोवेळी पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी विवीध कार्यक्रम, निवडणूका याबाबत दिलेल्या जबाबदा-या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.

मितभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणा-या रमेश पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल प्रदेश स्तरावरुन तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीबाबत बोलतांना रमेश पाटील म्हणाले की, माझी निवड पक्षनेतृत्वाने करुन माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याबद्दल मी शरद पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ.जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, ज्येष्ठ आ. एकनाथराव खडसे, अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीष पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, माजी आ. संतोष चौधरी, ॲड. रोहिणीताई खडसे, वंदना चौधरी यांच्यासह सर्व वरिष्ठांचा आभारी आहे. तसेच सर्वांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र व जिल्ह्य़ात पक्षसंघटन मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. व या वाटचालीत सर्वांचे सहकार्य व आशिर्वाद कायम असतील हि अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here