राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक

0
104

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब साहेब हे धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी दी.18 फेब्रुवारी 2022 रोजी , राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक घेतली व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून समस्या जाणून घेतली, त्यानंतर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष सलीम शेख व शहराध्यक्ष जमीर शेख यांनी आपला कार्यअहवाल प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांना सादर केला  व त्यानंतर धुळे शहरातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्ष अझर पठाण यांनी  प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्याशी चर्चा करीत धुळे शहरातील नागरिकांची समस्या व शहराच्या विकास कामांसाठी निधीची मागणी केली, व येत्या काळात आम्ही संघटन बांधणी करून शहरातील वेगवेगळ्या भागात कार्यकर्ते व पदाधिकारी वाळवून घेणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता काबीज करू असेही अजहर पठाण यांनी सांगितले ह्या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सलीम शेख , शहराध्यक्ष जमीर शेख , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले , उपाध्यक्ष असिफ बेग मिर्झा,  हाजी युसुफ नॅशनल ट्रॅव्हल्स मालेगाव , अल्लाउद्दीन शेख चाळीसगाव , इरफान सय्यद, महेंद्र शिरसाठ, महिला आघाडीचे शकीला बक्ष , जया साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here