Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षासाठी रस्सीखेच
    राजकीय

    राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षासाठी रस्सीखेच

    SaimatBy SaimatMarch 24, 2022Updated:March 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुबंई : प्रतिनिधी
    राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत महत्त्वाच्या या पदासाठी बीडमधून रेखा फड आणि हेमा पिंपळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही नेत्या अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रीय आहेत. आपापल्या स्तरावर पक्षश्रेष्ठीकडे बातचीत सुरू झाली आहे. मराठवाड्याला अद्याप राज्यस्तरीय पद मिळालं नाही, त्यामुळे आता बीड जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मराठवाड्यात बीड जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. राष्ट्रवादीला भरभरून देणारा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाते. मंत्री धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील सतत बीड जिल्ह्याचा दौरा करत असतात. त्यामुळे बीड जिल्ह्याची अपेक्षा वाढली आहे.
    रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
    राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षादेखील आहेत. हे पद अर्धन्यायिक स्वरुपाचे आहे. त्यामुळे या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहू नये असा अलिखित नियम आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोडल्याचं सांगण्यात येत आहे. आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत रेखा फड
    बीडमधील नेत्या रेखा फड ह्या पूर्वी मनसेत बीड महिला जिल्हा प्रमुख पदी कार्यरत होत्या. गेली दहा वर्षांपासून त्या राष्ट्रवादीत कार्यकरत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पद देखील भूषविले आहे. लक्षवेधी आंदोलनामुळे त्या राज्यात चर्चित आहेत. त्यांच्या मागे महिलांचे मोठे संघटन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
    हिजाब समर्थनार्थ उतरलेल्या हेमा पिंगळेही स्पर्धेत
    नुकत्याच झालेल्या हिजाब समर्थनार्थ मोर्चात नेतृत्व करणाऱ्या बीडच्या हेमा पिंगळे यादेखील प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेत आहेत. वकील असलेल्या हेमा पिंगळे या 20 वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. हेमा पिंगळे यांनी शिवसेनेत नऊ वर्षे काम केले होते. त्यावेळीही त्यांनी महिला आघाडी जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना महागाईविरोधात आंदोलन केले होते. शासकीय अधिकाऱ्यांना बांगड्या भेट देऊन आंदोलनही केले होते. 2010 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.