जळगाव: रावेर येथील बऱ्हाणपूर रोड वरील आठवडे बाजाराजवळील देसर्डा जीनमधील मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेडने शिवजन्म साजरा करीत पाळणा म्हणत शिवजन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला.
शिवराय मनामनात…शिवजयंती घराघरात… या जयघोषाप्रमाणे प्रत्येक दारी व शिवजन्मउत्सवाचे ठिकाणीसुध्दा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. व पाळण्यात प्रत्येक्ष लहन मुलाला टाकून दोरीने पाळणा हलवीत गोड आवाजात शिवजन्मावर आधारीत पाळणाही म्हणण्यात आला.
सर्व महिलांनी व मुलींनी नऊवारी परिधान करून नाकात नथ घातल्या होत्या. तसेच यावेळी फुगडी देखील खेळण्यात आली.
सखुबाई पाटील, उषा पाटील, संगीता महाजन, सविता पाटील, शोभा पाटील,
माधुरी पाटील, विमल पाटील, संगीता महाजन, मंगला पाटील, लिना महाजन,
नयना पाटील, सुवर्णा पाटील, वेशाली पाटील, आशा पाटील, रूपाली पाटील, उज्जवला पाटील आदी महिला सहभागी झाल्या होत्या. सुखी, हर्षदा, भूमी, मोनिका, कल्याणी, श्वेता आदी मुलींनी देखिल सहभाग नोंदविला.