रावेर प्रतिनिधी
रावेर परिसरात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा फटका बसला असून, जोरदार पावसासह वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मुख्यता केळी बागांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावेळी आज मौजे अहिरवाडी (रावेर) येथे मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसाग्रस्त केळी बागांना परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, तहसिलदार यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले शेतातील पिके दाखवून विदारक परिस्थितीचे कथन केले व शेतकऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता, पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना धीर दिला व लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन खा.रक्षाताई खडसे यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख श्री.सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. नंदू महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष श्री. राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस श्री.सी.एस.पाटील, श्री.विजय महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील, श्री.जुम्मा तडवी, श्री.अमोल पाटील, श्री. हिरालाल कोळी, श्री.संदिप सावळे, श्री.महेश पाटील, श्री.सुनिल पाटील, भाजयुमो तालुका सरचिटणीस श्री. शुभम पाटील, श्री. लक्ष्मण महाजन, ग्रा.प.सदस्य श्री.पंकज चौधरी, श्री.बंडू पाटील, श्री.गणेश चौधरी, श्री.तुषार पाटील, श्री.नागेश्वर चौधरी, श्री.जितू चौधरी, श्री.राजू चौधरी, श्री.मनोज महाजन, श्री.गोविंदा चौधरी, श्री.शालिक सावळे, नुकसानग्रस्त शेतकरी श्री.संजय राजाराम चौधरी, श्री.विशाल रमेश चौधरी, श्री.राहुल प्रकाश महाजन, श्री.अनिल चौधरी, श्री. टी. बी. पाटील, श्री.सुनिल विश्राम चौधरी, श्री.रमेश नारायण चौधरी, श्री.सिद्धेश रविंद्र चौधरी, श्री.किशोर नरायण महाजन, श्री.दिगंबर राजपुत, श्री.देवेंद्र चौधरी, श्री.प्रशांत चौधरी, श्री.विश्वनाथ महाजन, श्री.ईश्वर चौधरी, श्री.किशोर चौधरी, श्री.सदाशिव चौधरी, श्री.विठ्ठल चौधरी, श्री.देवानंद महाजन, श्री.अशोक चौधरी, श्री.युवराज चौधरी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.