साईमत, प्रतिनिधी, जळगाव,
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून अभियांत्रिकेतील “कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. आयआयटी इंदूर येथील संगणक विभागातील प्राध्यापक डॉ.रणवीर सिंग हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्याच्याच हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख सोनल पाटील तसेच आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. प्रमोद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाची शैक्षणिक व विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच “कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटीबद्दलही विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.रणवीर सिंग यांनी कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटीमधील अल्गोरिदम, सेट थेअरीच्या कम्प्युटेशनल संकल्पना, मॅट्रीसेस-डिटर्मिनंट व गणित आणि संगणक अल्गोरिदम या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसरणही डॉ.रणवीर सिंग यांनी केले.
सदर कार्यक्रमात 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. पूजा नवाल, प्रा. योगिता धांडे, प्रा. शरयू बोंडे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. रश्मी झांबरे यांनी सहकार्य केले तर या कार्यशाळेचे सूत्रसंचालन ईश्वरी नेमाडे व आभार प्रदर्शन प्रज्वल वाकुलकर या विध्यार्थ्यानी केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.