मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मोठ्याप्रमात पोलीस भरती करण्यात येणार आहे. या भरतीत ७ हजार पदांसाठी १५ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत राज्याच्या गृहविभागातून ही माहिती मिळत आहे.
राज्यभरात लवकरच पोलीस भरती सुरू होणार आहे. पोलीस दलातील रिक्त जागांसाठी १५ जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विविध पदांसाठी ७ हजार जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
अधिकृत तारखेची माहिती जाहीर केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलीस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलीस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. त्यातच आता गृहविभागाने आतापर्यंत साडे पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर ७ हजार भरतीची प्रक्रियेला १५ जूनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.