मुंबई : प्रतिनिधी
मध्यरात्रीनंतर उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनीती यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे पियूष गोयल (48), अनिल बोंडे (48), काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी (44), राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (43) व शिवसेनेचे संजय राऊत (41) हे पाच उमेदवार पहिल्या फेरीत विजयी झाले. सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडीक व शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत रंगली. भाजपाचे गोयल अणि बोंडे यांना प्रत्येकी 48 मते मिळाल्यामुळे व विजयासाठी 41 मतांचा कोटा असल्याने दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत या दोघांची अतिरिक्त मते संजय महाडीक यांना प्राप्त झाली व ते विजयी झाले. दरम्यान बुलढाण्याचे मुकुल वासनिक हे काँग्रेसच्या तिकिटावर राजस्थानमदून विजयी झाले आहेत.
“कोल्हापूरचा पैलवानच
भेट दिला”
शुक्रवारी सकाळपासून या मतदानाला सुरुवात झाली होती. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होता मात्र, मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये संजय पवार यांना फक्त 38 मते मिळाली असून धनंजय
देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला!राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच, त्यांनी संजय राऊतांना देखील खोचक टोला लगावला आहे.
आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहेमहाडिकांना 41 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे. तिथे दुसरीकडे भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांची रणनीती कामी आल्याचे देखील बोलले जात आहे. “चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
जोरोका झटका धीरेसे…
राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे तसेच या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांचादेखील विजय झाला. या विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. “यालाच म्हणतात जोरोका झटका धीरेसे लगे. धक्का लगाल्यानंतरही विचारले तर शरद पवार म्हणतील लागलं नाही. ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे वीस तारीख आहे. त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे. त्यांना धक्क्यावर धक्के सहन करावेच लागणार आहे. तेव्हादेखील त्यांनी म्हणावे की, काही लागले नाही,” असे अनिल बोंडे म्हणाले.



