जळगाव : प्रतिनिधी
राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवस जळगाव दौ-यावर येत आहेत. या दोन दिवसात ते जैन हिल्स आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाला भेटी देणार आहेत.
महामहिम राज्यपालांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता औरंगबाद विमानतळावरुन विमानाने रवाना. सायंकाळी सहा वाजता जळगाव विमानतळावर आगमन. 6 वाजून 20 मिनीटांनी जैन हिल्स येथे आगमन व मुक्काम. सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाकडे कारने रवाना. 2 वाजून 10 मिनीटांनी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात आगमन व राखीव 3 वाजून 30 मिनीटांनी जळगाव विमानतळाकडे प्रस्थान. 3.50 वाजता जळगाव विमानतळावर आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता विमानाने प्रस्थान .