राजाने उडी टाकू नये अन्‌ टाकली तर माघार घेवू नये

0
87

जळगाव ः प्रतिनिधी
‘राजाने एक तर उडी टाकू नये, टाकली तर माघार घेवू नये’, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर काल निशाणा साधला.

राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जळगावात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते निलेश बोरा यांच्या घरी मंत्री बच्चू कडू यांनी काल सकाळी भेट दिली असता ते बोलत होते. नवनीत राणांना ईडीची नोटीस आली होती. भाजपाचे पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी त्यांना तो कार्यक्रम दिला. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हटली तर ईडीचे संकट टळेल, अशा शब्दात भाजप व राणा यांनाही बच्चू कडू यांनी टोला लगावला. कार्यक्रमादरम्यान सत्कार समारंभानंतर मंत्री कडू यांनी कार्यकर्ता कसा असावा यावर आपले मत व्यक्त केलेे.

कार्यकर्ता नेता घडवतो
नेता कार्यकर्ता कधीही घडवत नसतो परंतु, कार्यकर्ता नक्कीच नेता घडवतो असे मत त्यांनी व्यक्त केले. सामान्य कार्यकर्ता असलेले निलेश बोरा यांच्या घरी आल्याने आमचा सन्मान वाढल्याचे सांगताना असे कार्यकर्ते नेत्यांची वाट चुकू देत नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here