मुंबई : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 46,690 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 67,200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,690 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,940 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,810 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,120 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,740 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,990 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 672 रुपये आहे.