जळगाव : प्रतिनिधी
युवा सेना जळगाव महानगरतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात दुपारी 1 वाजता युवा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा संवादावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा.ना.श्री.उदय सामंत यांना सुप्रसिद्ध निवेदक व मुलाखतकार श्री.सुधीर गाडगीळ (मुंबई) हे आपल्या बहारदार शैलीच्या माध्यमातून ‘युवकांच्या शैक्षणिक प्रश्नांवर’ मुलाखतीद्वारे बोलतं करणार आहेत. यासाठी जळगावसह जिल्हाभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी या संवादासाठी सविनय निमंत्रित आहेत. चुकवू नये अशा या संवादातून सद्यःस्थितीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कमालीची संभम्रावस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक यानिमित्ताने नक्कीच दूर होणे शक्य आहे. त्यामुळे जळगावसह जिल्हाभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने युवा संवादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थिती द्यावी, असे आवाहन युवा सेना जळगाव तर्फे करण्यात आले आहे.