युवासेनेतर्फे भोंगा बजाओ, महंगाई भगाओ आंदोलन

0
37

जळगाव : प्रतिनिधी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचललेल्या भोंग्यांच्या मुद्द्यांवरून जळगावात युवासेना महानगरतर्फे उपहासात्मक असे “भोंगा बजाओ, महंगाई भगाओ” आंदोलन पुष्पलता बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपावर करण्यात आले. यात राज ठाकरे यांच्यासह राणा दांपत्य आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. तसेच वाढलेल्या महागाईवरून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा अधिकारी शिवराज पाटील, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरीता माळी कोल्हे, शहर प्रमुख ज्योती शिवदे, युवासेना महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पियुष गांधी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रितम शिंदे, भुषण सोनवणे, उमाकांत जाधव, यश सपकाळे, जय मेहेता, अमोल दहाड, गिरीष सपकाळे, अमोल मोरे, अभिजित रंधे, पुष्पक सुर्यवंशी, यश सोनवणे, मयूर रंधे, प्रतिक देवराज, शैलेंद्र राजपूत, सचिन शर्मा, वैषाली झाल्टे, वैष्णवी खैरनार, जया थोरात आदि उपस्थित होते.
“वाहरे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल”, “पेट्रोल डिझेल सौ पार, हेच का अच्छे दिन मोदी सरकार?”, “बहुत हुई महंगाई की मार, होश मे आओ मोदी सरकार”, “देश संभाले संटाबंटा, बेहाल हो गई सारी जनता”, या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यासह मोदीजींचा 2014 पुर्वीचा इंधर दरवाढ विषयाचे भाषण व आश्वासन भोंग्यावर वाजवून मोदी सरकारला निवडणूक पुर्वीचे दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. यावेळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here