युवासेना उपजिल्हा युवा अधिकारीपदी आनंद धनगर

0
28

साईमत साकेगाव ता. भुसावळ वार्ताहर

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात, शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार भुसावळ विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. यात साकेगाव येथील आनंद (बबलु) पुंडलिक धनगर यांची उपजिल्हा युवा अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली.

भुसावळ विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा चिटणीसपदी हेमंत पुरुषोत्तम बऱ्हाटे, उपजिल्हा युवा अधिकारी आनंद (बबलु) पुंडलिक धनगर, तालुका युवा अधिकारी सूरज प्रमोद पाटील, शहर युवा अधिकारी पवन गणेश बाक्से यांची नेमणूक करण्यात आली. नवनियुक्तांचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, विस्तरक चैतन्य बनसोडे, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. चंद्रकांत शर्मा, शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबाईत, संतोष माळी व सर्व शिवसेना, युवासेना व अंगीकृत संघटनांकडून कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here