दिल्ली :
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले जात असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. रशियाच्या या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू, असे युक्रेनने सांगितले आहे. युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिले असून त्यांची पाच लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला. युद्ध थांबावे यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती युक्रेनने संयुक्त राष्ट्र संघाला केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताकडेही मदत मागणार आहे.
युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी, अशी विनंती युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा मोदींना भेटून करणार आहेत. ते म्हणालेत की, “भारताचे रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तत्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करणार आहोत.
“पहाटे ५ वाजता हा हल्ला सुरू झाला आहे. अनेक युक्रेनियन विमानतळं, लष्करी विमानतळं, लष्करी व्यवस्थापनं यांच्यावर बॉम्ब आणि क्षेपणास्त्र पडले आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली.