चाळीसगाव प्रतिनिधी मुराद पटेल
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये भडकलेल्या युध्दाच्या झळा जगातील अनेक लोकांना बसत असतानाच याच युक्रेनमध्ये चाळीसगावचा एमबीबीएस चा विद्यार्थी यश राजेंद्र परदेशी हा युद्ध जन्य परिस्थिती उद्भवल्याने अडकला आणि प्रत्येक मुलाच्या आई वडील भाऊ भहीणी आणि नातलगांना जशी काळजी आपल्या मुलाची वाटते तशीच काळजी चाळीसगावातील राजेंद्र परदेशी आणि आर्किटेक आकाश परदेशी व त्यांच्या सर्व परिवाराला लागली आपला मुलगा भाऊ मायदेशी परत येत नाही तोपर्यंत हा सर्व परिवार चिंताक्रांत होता युक्रेनमधील खार्किव राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापिठात यश परदेशी एम. बी. बी. एस. च्या शिक्षणासाठी नुकताच ७ फेब्रुवारी रोजी भारतातून गेला होता तेथे पंधरा दिवस खार्किव येथे मुक्काम केल्यानंतर त्यांचे कॉलेज सुरू झाले कॉलेजचे दोन दिवस नियमित झाल्यानंतर लागलीच युद्ध भडकले आणि सर्वत्र गोळीबार बॉम्ब हल्ले सुरू झाले त्यानंतर यश परदेशी आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक भारतीय विद्यार्थी तेथे असलेल्या बंकरमध्ये जवळपास सहा दिवस कुठल्याही सुविधा नसताना जीव वाचवण्यासाठी लपून बसले नंतर सातव्या दिवशी म्हणजेच दिनांक दोन मार्च रोजी ते दहा किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचले त्यानंतर सुदैवाने त्यांना रेल्वे मिळाली आणि जवळपास वीस तासांचा रेल्वेचा प्रवास करून त्यांना ल्विव्ह येथून पोलंडच्या बॉर्डर वर जाण्यासाठी टॅक्सी मिळाली पोलंडच्या सीमेवर पोहोचल्यानंतर तेथे सीमा ओलांडण्यासाठी भल्यामोठ्या लांब रांगा लागलेल्या होत्या जवळपास आठ तास रांगेत उभे राहून रात्री एक वाजता त्यांना सीमा ओलांडता आली आणि मग बाहेर त्यांची वाट पाहत असलेल्या भारतीय दूतावासाच्या लोकांनी त्यांची रीतसर चौकशी करून त्यांना भारतात येण्यास मदत केली आणि दिनांक सहा मार्च रोजी यश राजेंद्र परदेशी हा या सर्व खडतर जीवघेण्या प्रवासातून सुखरूप आपल्या मायदेशी परतला चाळीसगावात सर्व आप्तस्वकीय नातेवाइकांनी आणि गावकर्यांनी त्यांचे मन भरून स्वागत केले आणि आई वडील भाऊ बहीण सर्व नातेवाईकांनी आपला जिवाचा जिवलग यश परदेशी सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद साजरा केला चाळीसगावचे शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे प्रदीप पिंगळे सुभाष राठोड यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली व संपूर्ण परिवाराला शुभेच्छा दिल्यात त्या वेळी यश परदेशी यांनी या पदाधिकाऱ्यांन जवळ आपला हा प्रवास कथन केला.