Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»या योगातील आसनाने तुम्ही राहू शकतात सदैव निरोगी
    Uncategorized

    या योगातील आसनाने तुम्ही राहू शकतात सदैव निरोगी

    SaimatBy SaimatJune 21, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपल्या भारत भुमित योग फार फार प्राचीन कालापासून ज्ञात आहे. योगाचे मुळ भारत देश आहे. योग आपल्या संस्कृतित पूर्वी पासून असला तरी आज कोरोना परिस्थीती मुळे त्याचे महत्त्व अधिक वाटत व वाढत आहे. योग आपण घरी राहुण, सुरक्षित राहुण आपल्या कुटुंबासोबत करू शकतो व आजचा प्रत्येकावर वाढलेला ताणतणाव कमी करू शकतो व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवु शकतो. हीच आजच्या काळाची आताची खरी गरज आहे
    ‘योग’ हा शब्द संस्कृत ‘युज’ या धातूपासून बनलेला आहे अर्थ “जोडणे”. म्हणूनच तर म्हणतान योगाने शरीर मन व आत्म्याचे ऐक्य साध्य होते. या एकत्रितते मुळे आनंद व शांतीची अनुभूती येते व जीवन प्रगत होण्यास सहाय्य ठरते. शारीरीक व मानसिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त असणे हे फार महत्वाचे आहे.
    आजच्या धगधगत्या जीवन शैलीचा परिणाम, वाढलेला ताण तणाव या मुळे शारीरीक व मानसिक आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत आहे. त्याच बरोबर दंत आरोग्यावर ही दुष्परिणाम होतात व ते आपल्याला ठाऊक नाही. मी दंतचिकित्सक असल्याने या परिणामांकडे आपले लक्ष वेधून आपणास जागरुक करू इच्छिते.
    आपल्याला जर अधिक ताणतणाव असतील तर आपण आपल्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, दातांची नीट निगा न राखल्याने दातांवर चिकट थर (dental Plaque) जमतो, जीव जंतु वाढतात व त्यामुळे कीड लागणे, हिरडींचे विकार, मौखिक दुर्गंधी सारख्या समस्या प्रबळतात. शिवाय दातांकडच्या दुर्लक्षीततेमुळे योग्य उपचार घेत नाही, किंवा अर्धवट करतो व परिणामी दात गमावतो. दात व दंतआरोग्य जपले नाही तर जेवण नीट होत नाही परिणामी शक्ती व ताकद मिळत नाही, रोगप्रतिकार कमी होतो परिणामी इतर आजार होतात व आयुष्य कमी होते.
    वाढत्या तणावामुळे शरीरात inflammatory cytokines, oxidative stresses वाढतात रोगप्रतिकार पैशी कमी होतात. यामुळे हिरडींचे विकार अर्थात रक्त येणे, लालसरपणा दिसणे, दातांचे मूळ ढिले होणे, infections होणे, पायोरिया होणे,तोंडातील जखमा लवकर बऱ्या न होणे इत्यादी अडचणी येतात. शिवाय इतर आजार जसे thyroid, हृदय विकार, diabetes, BP, किडणीविकार यांचे ही परिणाम मौखिक आरोग्यावर होतात. लाळेचे प्रमाण कमी झाल्याणे किड, हिरडी समस्या, दुर्गंधी अनेक विकार होतात. त्या मुळे दात चावणे, दात घासणे नकळत केले जाते व त्यामुळे दातांची झीज होते. या कारणाने Sensitivity होते. जबड्याचे हाड झीजने, तोंडाच्या स्नायुना इजा होते व वेदना होतात.
    या सर्वांवर रामबाण उपाय ‘योग’ ठरतो. योग केल्याने मानसिक शांती लाभते, आपण आरोग्या विषयी जागरूक राहतो, आनंदी राहतो व सहज रित्या या समस्या हाताळु शकतो. शिवाय inflammatory cytokines, oxidative stresses कमी होतात व आपले मौखिक आजार लवकर बरे होण्यास साहाय्य होते. त्याचबरोबर योगा ने शारीरीक व्याधी ही सुधारतात. काही आसनां मुळे मुखातील लाळे चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
    योग म्हणजे आसन, प्राणायाम, व ध्यान. ते घरीच आपण सोप्या पद्धतीने नियमित करू शकतो व अनेक फायदयांचे लाभ प्राप्त करू शकतो. शक्यतो योग हे पहाटे उठून केलेले उत्तम व परिणामकारक असतात, नित्य नियमाने केलेले योग हे आपल्या शारीरिक, मानसिक व्याधी दूर ठेवण्यास मदत करतात. योग केल्यानंतर आपला संपूर्ण दिवस हा उत्साही राहतो. आपण त्या दिवशी पूर्ण क्षमतेने विना थकावट कार्यरत असतो. संपूर्ण जगाने योगा स्वीकरला आहे व त्याचे पासून आरोग्यावर होणारे सुपरिणाम मान्य ही केले आहेत. म्हणूच डॉक्टर सुद्धा आरोग्य सुधारणेकमी औषधांसोबत रुग्णास योगा ची जोड देतांना दिसत आहेत.
    — महत्वाची काही आसने—
    १) पदमासन-धकाधकीच्या दिवसानंतर हा साधासुधा व्यायाम तुमच्या मनाला आणि शरीराला आराम देऊ शकतो. तुमचे शरीर जितके जास्त तणावमुक्त असेल तितका तुमचा मेंदू स्वतःला पुनरुज्जीवित करू शकेल.
    २) वज्रासन – प्राणायामाच्या अभ्यासाकरता केला जातो. सोपे व लोकप्रिय आसन आहे, जेवणा नंतर लगेच केले तरी चालते
    ३) शवासन–याने पचन क्रिया सुधारते. व मज्जासंस्थेवर फार चांगला परिणाम होऊन कार्यक्षमता वाढते.अधिक चा असलेला रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
    ४) ताडासन – पायाच्या बोटांपासून हातांच्या बोटांपर्यंत सर्व शरीर व स्नायू वरच्या दिशेने ताणल्यामुळे रक्तपुरवठा सुधारतो व कार्यक्षमता वाढते. यामुळे डोकेदुखी आणि निद्रानाश यापासून आराम मिळू शकतो.
    प्राणायाम…..
    १) दीर्घश्वसन – यामुळे फुफुसांची कार्यक्षमता वाढते, चयापचयाचा दर कमी होऊन ऊर्जेची बचत होते व स्फुर्ति येते, फुफ्फुसे लवचिक व सक्षम बनतात.
    २) अनुलोम विलोम- फुफ्फुसे सक्षम होतात.
    ३) भ्रामरी – क्रोध, बेचैनी, निद्रा नाश, उच्चरक्तदाब यावर अतिशय उपयुक्त ठरतो.
    तसेच इतर प्राणायाम जसे कपालभारती,भसरीका हे ही खुप उपयुक्त आहेत. चला तर मग रोज योग अभ्यास करू. आपण सक्षम बनू, घरी राहत कोरानाशी लढु व आरोग्य जपूया. तर मग हेची दान मागते देवा जीवनात योग हवा.

    ‘कल्पवृक्ष हा योगाचा प्रत्येकाच्या दारी असो, कल्पतरुच्या छायेखाली जीवन तुमचे सुखी असो” डॉ. विश्वास मंडलीक
    आपणा सर्वांना जागतिक योग दिन २१ जून २०२२ च्या हार्दिक शुभेच्छा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.