हैदराबाद : वृत्तसंस्था
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ED चौकशीवरून देशभरात काँग्रेसतर्फे निदर्शने सुरू आहेत. हैदराबादेत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याशी केलेल्या गैरवर्तानाच्या व्हिडिओची सध्या चर्चा सुरू आहे. रेणुका चौधरी यांनी पोलिसाची थेट कॉलर पकडल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे.
पोलिस आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्याचा प्रयत्न करत होते, त्यादरम्यान रेणुका चौधरी यांनी पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्यांना ओढण्यास सुरुवात केली. यानंतर इतर महिला पोलिसांनी रेणुका चौधरींनी आवरल्यावर त्याची कशीबशी सुटका झाली.
काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी देशभरात निषेध करण्यात करण्यात आला. बहुतांश राज्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते राजभवनांना घेराव करत आहेत. तेलंगणामध्ये अशाच एका आंदोलनादरम्यान रेणुका चौधरी यांनी पोलिस कर्मचाऱ्याशी असे गैरवर्तन केले.
राहुल गांधींच्या चौकशीला काँग्रेसचा विरोध
नॅशनल हेराल्डप्रकरणी बुधवारी रात्री 9 वाजेपर्यंत ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केली. राहुल गांधी रात्री 9.30 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर आले. चौकशीत सहभागी होण्यासाठी राहुल तिसऱ्यांदा ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते.
महाराष्ट्रातही झाली निदर्शने
ईडीच्या कारवाईच्या विरोधात गुरुवारी महाराष्ट्रातही राजभवनासमोर काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात राजभवनासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बुधवारीही काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आणि राहुल गांधींना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप केला.