यावल (सुरेश पाटील)
यावल शहरात होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड तसेच विकसित भागात नवीन पाईप लाईन मधून होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा “फियास्को” झाल्याने अनियमित आणि अल्पदाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या लेखी तक्रारी यावल नगरपालिकेत करण्यात आल्या.
यावल नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली पाईप लाईनची कामे आणि वीज पुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरचे अंदाजे 42 लाख रुपयाचे काम (कामे प्रत्यक्षात कोणी किती टक्केवारी खाऊन चमकोगिरी करून घेतली हे यावलकरांना चांगल्याप्रकारे माहीत आहे)मंजूर एस्टिमेट प्रमाणे ठेकेदाराने पाईप लाईनचे काम न केल्याने आणि टक्केवारी,लाच खाणारे भोंगळ कारभार करून काही लोकप्रतिनिधी आता सत्ते अभावी भुमिगत झाले असून निवडणुकीत पुन्हा विजयी होण्यासाठी ठराविक आपल्या पन्टरांच्या माध्यमातून समाजसेवेचा देखावा करीत हितचिंतक जनतेच्या संपर्कात येत आहेत आपल्या मतदारांना नियमित पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे किंवा नाही इत्यादी सुविधांकडे अनेक प्रभागातील लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना मनस्तापच झाल्याचा दिसून येत आहे.
यावल शहरात ठिकठिकाणी अनेक ठिकाणी पाणी पुरवठा दोन ते तीन दिवसाआड अनिमित अल्पप्रमाणात कमी दाबाने होत असल्याने नागरिक मोठे त्रस्त झाले आहेत, समस्यांना त्रस्त होऊन दि. 26 मे 2022 रोजी पालक नगर मधील नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार देऊन आपली समस्या मांडली.
दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की फालकनगर मधे होणारा पाणीपुरवठा अत्यंत धीम्या गतीने होत असतो,तसेच नवीन पाईप लाईन वरील नळ कनेक्शन द्वारे होणारा पाणीपुरवठा आपणाकडून दुसऱ्या माळ्या पर्यंत इलेक्ट्रिक मोटार न लावता पाणी पुरवठा होईल असा दावा जाहीररित्या करण्यात आलेला होता परंतु सदर पाणीपुरवठा अत्यंत धीम्या गतीने म्हणजेच असून नसल्यासारखा होत आहे. तरी आपण आपल्या तज्ञ अभियंत्यास समक्ष आमच्या परिसरातील पाणी पुरवठा योजनेची पाहणी पाईप लाईन वर बसविण्यात आलेल्या हॉलची गुंतागुंतीची विभागणी या सर्व गोष्टीची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन यावल शहरासाठी पाण्याचा मुबलक असलेला पाणीसाठा यावलकर यांना उपलब्ध करून द्यावा व नागरिकांची होणारी हेळसांड त्वरित थांबवावी असे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
तक्रार अर्जावर योगेश डोळे, यूसुफ पटेल,अशोक नेरकर, रामचंद्र सोनवणे,अशोक पाटील, महेश बोरसे,रमेश जोगी,संजय मोरेकर,रमेश मराठे,धीरज पाटील,शरद कोळी,विजय कायस्थ,भागवत बारी,अशोक नेवे,दिगंबर सावकारे,सौ.बेबाबाई पवार,पंकज तडवी,नितीन चौधरी,तेजेंद्र पाटील,रामदास भिरूड,प्रभाकर चौधरी,शिरीष चौधरी,कमलाकर बंगले, आत्माराम महाजन,विनोद कोळी, राहुल कायस्थ,संजय मोरे,गौरव जगताप,अनिल मोरे,दिलीप महाजन,निलेश चौधरी,डी.सी. पाटील,पि.आर सोनवणे,इतबार तडवी,जगदीश करांडे,श्रीराम बडगुजर सर यांनी स्वाक्षरी केली आहे.
नवीन टाकलेल्या पाईप लाईनचे नियोजन चुकल्याने तसेच एक्सप्रेस फिडर पाहिजे त्या क्षमतेचे न बसविल्याने वीज पुरवठा ट्रिप होत असल्याने होत असलेल्या पाणीपुरवठावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे त्यासाठी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी दोशी असलेल्या कॉन्ट्रॅक्टर/ ठेकेदारासह संबंधित पाणी पुरवठा विभाग प्रमुखावर कारवाई करून टक्केवारी खाणाऱ्यांच्या कामांबाबत आणि बनावट दस्त ऐवजाबाबत कडक कारवाई करावी अशी संपूर्ण यावल शहरातून मागणी होत आहे.