Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल शहरात सोशल मीडिया वरील समाज भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल चे पडसाद शहरात काही काळ तणावाचे वातावरण
    यावल

    यावल शहरात सोशल मीडिया वरील समाज भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल चे पडसाद शहरात काही काळ तणावाचे वातावरण

    SaimatBy SaimatJune 15, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल  प्रतिनिधी 

    सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात सध्या शांतता प्रस्थापित असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे .

    यावल शहरात एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट,सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तक्रार करीत असतांना मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होत पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी शहरातील बुरूज चौकात जमावाला थांबवत परत जाण्याच्या सूचना केल्या मात्र जमाव पांगत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.यामुळे दि.14 मंगळवारी रात्री शहरात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

    घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे हे देखील शहरात दाखल झाले आहेत.रात्री उशिरापर्यंत पोलीसांचा शहरातील विविध भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला.काल पासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट बाबत वाद सुरू असल्याने याबाबतची एकाकडून एका गटाकडून तक्रारही करण्यात आली होती मंगळवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे व येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांनी केले आहे.
    शांतता समिती बैठक कागदावर.

    काल दि.14रोजी संध्याकाळी 5 वाजता यावल पोलीस स्टेशन कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली या बैठकीचे आमंत्रण किंवा सूचना शांतता समितीच्या अनेक सदस्यांना न मिळाल्याने शांतता समितीच्या कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत काही सदस्यांना बोलाविले जात नसल्याने शांतता समिती सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे शांतता समितीच्या बैठकीत शहरातील अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत नसल्याने तसेच ठराविक सदस्य आपल्या सोयीनुसार प्राथमिक चर्चा करीत असल्याने शांतता समितीच्या इतर अनेक सदस्यांमध्ये आणि यावल शहरातील नागरिकांमध्ये शांतता समितीबाबत आणि कायदा सुव्यवस्था,जातीय सलोखा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.काल संध्याकाळी शांतता समितीची बैठक झाली आणि रात्री यावल शहरात शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे याला काय म्हणावे? असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.