यावल प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा मधुकराव चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यावल व परिसरातील दिव्यांग बांधवांना सायकल वाटपाचा कार्यक्रम दि.15 रोजी सकाळी यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात पार पडला.या प्रसंगी जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, यावल शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड,कृउबाचे माजी सभापती नितिन चौधरी,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीरखान,सकलेन शेख,नईम शेख,हाजी गफ्फार शाह,अजय बढे,पुंडलीक बारी, विक्की गजरे,काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे,कोरपावली सरपंच विलास अडकमोल,माजी सरपंच जलील पटेल,काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक अस्लम शेख,समिर मोमिन,सैय्यद युनुस,मनोहर सोनवणे,राष्ट्रवादीचे नाना बोदडे,मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवानेते धनंजय शिरीष चौधरी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना काही तरी मदत करावी या उद्देशाने संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाना स्वखर्चने 30 सायकल वाटप केल्या,यात यावल शहरात7दिव्यांग बांधवाना सुद्धा आज सायकल वाटप करण्यात आले यात गोपाल रमेश काकडे, मरेखा इसाखा,आशा सुभाष कोळी,बाळू लक्ष्मण वाणी,कय्युम खान नूर,शाहीनबीन सय्यद अलाउद्दीन या दिव्यांग बांधवांचा समावेश आहे .