यावल : तालुका प्रतिनिधी
यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण 11 प्रभागासाठी 23 पालिका सदस्य निवडले जाणार असून त्यासाठी आज सोडतद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती जमातीसाठी प्रभाग 2 व 5 तसेच अनुसूचित जमातीसाठी प्रभाग 3 व 11 मध्ये आरक्षण ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारण 19 जागा असून त्यात 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
शहरातील प्रभागनिहाय आरक्षण असे –
प्रभाग क्र. 1 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. 3 अनुसूचित जमाती (महिला), ब- सर्वसाधरण, प्रभाग क्र. 4 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 5 अ – अनुसूचित जाती (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 6 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 7 अ – सर्वसाधारण (महिला) ब – सर्वसाधारण प्रभाग क्र. 8 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 9 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 10 अ – सर्वसाधारण (महिला), ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. 11 अ – अनुसूचित जमाती, ब – सर्वसाधारण (महिला), क – सर्वसाधारण (महिला)